मेणकाम
मेणकाम : (वॅक्स वर्क). मेणापासून तयार करण्यात येणाऱ्या विविध कलात्मक वस्तू तसेच मेणाचा एक माध्यम म्हणून उपयोग करून तयार करण्यात येणाऱ्या बाबींचा यात अंतर्भाव करण्यात येतो. रासायनिक दृष्ट्या मेण हे तेल व चरबी ह्या कार्बन संयुगांत मोडले जाते. प्राणी, वनस्पती व खनिज पदार्थ यांपासून ते उपलब्ध होते.